पोटदुखी कायम होते का? कारणे, लक्षणे आणि योग्य उपचार!

Patient experiencing chronic stomach pain and abdominal discomfort

पोटदुखी ही खूप सामान्य समस्या आहे. कधी गॅसमुळे, कधी चुकीच्या खाण्यामुळे तर कधी एखाद्या गंभीर आजारामुळेही पोटदुखी होऊ शकते. पण जर पोटदुखी वारंवार होत असेल, अनेक दिवस टिकत असेल किंवा औषध घेतल्यावरही कमी होत नसेल, तर ती दुर्लक्ष करणेधोकादायक ठरू शकते. या लेखात आपण पोटदुखी कायम का होते, त्यामागची कारणे, लक्षणे आणि कधी डॉक्टरांकडे जाणे गरजेचे आहे हे सोप्या भाषेत समजून घेणार आहोत.

पोटदुखी कायम होण्याची मुख्य कारणे:

कायम पोटदुखी होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. सर्वात सामान्य कारण म्हणजे ऍसिडिटी आणि गॅस. वेळेवर जेवण न करणे, जास्त तिखट किंवा तेलकट पदार्थ खाणे, चहा-कॉफीचे अतिसेवन यामुळे पोटात आम्ल तयार होते आणि त्यामुळे जळजळ व वेदना होतात. काही लोकांमध्ये बद्धकोष्ठता म्हणजेच शौच नीट न होणे हेही पोटदुखीचे कारण ठरते. पोट साफ न झाल्यामुळे पोट फुगणे, जडपणा आणि वेदना जाणवतात.

संसर्गजन्य आजार जसे की पोटात जंतुसंसर्ग, फूड पॉइझनिंग किंवा दूषित पाणी पिल्यामुळेही पोटदुखी होते. यामध्ये जुलाब, उलटी, ताप अशी लक्षणेही दिसू शकतात.

महिलांमध्ये पाळीशी संबंधित त्रास, ओव्हरीजचे प्रॉब्लेम्स किंवा हार्मोनल बदल यामुळेही खालच्या पोटात वेदना जाणवू शकतात.

कधी कधी अपेंडिक्स, पित्ताशयातील खडे, किडनी स्टोन, अल्सर किंवा आतड्यांचे आजार यामुळेही सतत पोटदुखी होऊ शकते. अशा वेळी वेदना तीव्र असतात आणि दुर्लक्ष केल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते.

पोटदुखीची लक्षणे कोणती असू शकतात?

पोटदुखी फक्त दुखण्यापुरती मर्यादित नसते. त्यासोबत पोट फुगणे, जळजळ, मळमळ, उलटी, जुलाब किंवा शौच करताना त्रास जाणवू शकतो. काही लोकांना भूक न लागणे, वजन कमी होणे किंवा सतत थकवा जाणवणे अशी लक्षणेही दिसतात. जर पोटदुखीबरोबर ताप, रक्तस्राव, किंवा तीव्र वेदना होत असतील तर ते गंभीर संकेत मानले जातात.

पोटदुखी टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी?

पोटदुखी टाळण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे योग्य जीवनशैली. वेळेवर आणि हलकं जेवण करणे, जास्त तेलकट-तिखट पदार्थ टाळणे, पुरेसं पाणी पिणे आणि रोज पोट साफ होईल याची काळजी घेणे गरजेचे आहे. बाहेरचे उघडं अन्न आणि दूषित पाणी टाळणेही तितकंच महत्त्वाचे आहे. ताण-तणाव कमी ठेवणे आणि पुरेशी झोप घेणे याचा थेट परिणाम पचनसंस्थेवर होतो.

कधी डॉक्टरांकडे जाणे आवश्यक आहे?

जर पोटदुखी सतत चालू असेल, दिवसेंदिवस वाढत असेल, औषध घेतल्यावरही आराम मिळत नसेल किंवा पोटदुखीबरोबर उलटी, ताप, रक्त येणे अशी लक्षणे दिसत असतील, तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. योग्य तपासणी करूनच नेमकं कारण समजू शकते आणि वेळेवर उपचार केल्यास मोठे त्रास टाळता येतात.

पोटदुखीला हलकं न घेता वेळेवर लक्ष दिल्यास आरोग्य चांगले राहू शकते. Ekvira Healthcare मध्ये अनुभवी डॉक्टर आणि आवश्यक तपासण्यांची सुविधा उपलब्ध असून योग्य मार्गदर्शन आणि उपचार दिले जातात.

जरूर वाचा, स्ट्रोक येण्यापूर्वी दिसणारी लक्षणे – वेळेवर ओळखणे खूप महत्वाचे आहे?

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like these