लहान मुलांचे आरोग्य मजबूत राखण्यासाठी लसीकरण ही सर्वात महत्वाची आणि आवश्यक गोष्ट आहे. जन्मानंतरच्या पहिल्या काही वर्षांत मुलांची रोगप्रतिकारक शक्ती अजून पूर्ण विकसित नसते, त्यामुळे त्यांना संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता जास्त असते. लसीकरणामुळे शरीराला त्या आजारांशी लढण्यासाठी आवश्यक संरक्षण आधीच मिळते. त्यामुळे गंभीर आजार, हॉस्पिटलायझेशन आणि अनावश्यक त्रास मोठ्या प्रमाणात टाळता येतो.
पालकांचे अनेकदा प्रश्न असतात की – “बाळाला कोणती लस द्यायची?”, “लसीकरण उशिरा झालं तर चालतं का?”, “लसींचे काही दुष्परिणाम असतात का?”
हा ब्लॉग या सगळ्या प्रश्नांची सोपी आणि स्पष्ट उत्तरे देण्यासाठी आहे.
लसीकरणाची गरज का आहे?
लहान मुलं घराबाहेर खेळताना, शाळेत जाताना किंवा इतरांशी संपर्कात येताना अनेक प्रकारच्या जंतूंना सामोरं जातात. हे जंतू सहजपणे त्यांच्यावर संसर्ग करू शकतात. लसी शरीरामध्ये अगोदरच ‘सिक्युरिटी सिस्टम’ तयार करून ठेवतात. लसीकरणानंतर शरीर त्या आजाराला ओळखतते आणि लगेच त्याच्याशी लढण्यासाठी अँटीबॉडीज तयार करतो. त्यामुळे आजार होण्याची शक्यता कमी होते, आणि जरी आजार झाला तरी त्याची तीव्रता खूप कमी असते.
महत्वाच्या लसी आणि त्या केव्हा द्याव्यात?
भारतातील National Immunization Schedule मुलांसाठी पूर्ण सुरक्षित आणि वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध करण्यात आला आहे. खाली मुलांच्या वयानुसार आवश्यक लसींची माहिती दिली आहे:
- जन्मावेळी द्यायच्या लसी: या लसी जन्मानंतर हॉस्पिटलमध्येच दिल्या जातात.
- BCG – क्षयरोगापासून संरक्षण
- Hepatitis B (Birth dose) – यकृताच्या गंभीर संसर्गापासून संरक्षण
- OPV (Oral Polio Vaccine) – पोलिओपासून बचाव
- 6 आठवडे – 6 weeks
- DTwP / DTaP 1 – डांग्या खोकला, घटसर्प व टिटॅनसपासून बचाव
- Hib–1 – मेंदूज्वर आणि फुफ्फुस संसर्गापासून संरक्षण
- IPV–1 – इंजेक्शनद्वारे दिली जाणारी पोलिओ लस
- Hep B2
- PCV 1 – निमोनिया आणि कानाच्या संसर्गापासून बचाव
- Rota–1 – उलटी-जुलाबाच्या गंभीर आजारापासून संरक्षण
- 10 आठवडे – 10 weeks
- DTwP / DTaP 2
- Hib–2
- IPV–2
- Hep B3
- PCV 2
- Rota–2
- 14 आठवडे – 14 weeks
- DTwP / DTaP 3
- Hib–3
- IPV–3
- Hep B4
- PCV 3
- Rota–3
- 6 महिने – 6 months
- Influenza–1 – फ्लू आणि व्हायरल तापापासून बचाव
- 7 महिने – 7 months
- Influenza–2
- 6-9 महिने – 6-9 months
- Typhoid Conjugate Vaccine – टायफॉईड ताप होण्यापासून शरीराचं संरक्षण
- 9 महिने – 9 months
- MMR 1 (Mumps, Measles, Rubella) – गोवर, गालगुंड आणि रुबेला आजारापासून बचाव
- 12 महिने – 12 months
- Hepatitis A–1 – दूषित पाण्याने होणाऱ्या पिवळ्या काविळीपासून संरक्षण
- 12-15 महिने – 12-15 months
- PCV Booster
- 15 महिने – 15 months
- MMR 2
- Varicella – कांजिण्या (Chickenpox) आजारापासून संरक्षण
- 16-18 महिने – 16-18 months
- DTwP / DTaP
- Hib
- IPV
- 18-19 महिने – 18-19 months
- Hepatitis A–2
- Varicella 2
- 4-6 वर्षे – 4-6 years
- DTwP / DTaP
- IPV
- MMR 3
- 9-15 वर्षे – 9-15 years
- HPV (2 Doses) – भविष्यातील गर्भाशयाच्या कॅन्सरपासून संरक्षण
- 10-12 वर्षे – 10-12 years
- Tdap / Td – टिटॅनस व घशाच्या गंभीर संसर्गापासून बचाव
- 2nd, 3rd, 4th & 5th Year
- Annual Influenza Vaccine – दरवर्षी होणाऱ्या फ्लूपासून संरक्षण
लसीकरण चुकले तर काय करावे?
कधी कधी आजारपण, प्रवास किंवा इतर कारणांमुळे मुलांचे लसीकरण उशिरा होते. अशावेळी घाबरण्याची गरज नाही. डॉक्टर catch-up vaccination schedule बनवून देतात. जितक्या लवकर सुरू कराल तितकं मुलासाठी चांगले.
लसीचे दुष्परिणाम असतात का?
बहुतेक लसी सुरक्षित आणि वैज्ञानिकदृष्ट्या प्रमाणित आहेत. काही मुलांना हलका ताप, लालसरपणा किंवा सूज जाणवू शकते. हे दुष्परिणाम साधारण 1-2 दिवसांमध्ये आपोआप कमी होतात. गंभीर दुष्परिणामाची शक्यता अत्यंत कमी असते. डॉक्टरांकडून लसीकरण करणं हे 100% सुरक्षित आणि आवश्यक आहे.
जरूर वाचा, फिजिओथेरपी कधी आणि का गरजेची आहे?