आपण दिवसभर मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही किंवा टॅबवर किती वेळ घालवतो हे कधी लक्षात येते का? आता घरात, ऑफिसमध्ये, कॉलेजमध्ये सगळीकडे टेकनॉलॉजि चे प्रमाण वाढले आहे आणि त्याचाच परिणाम थेट आपल्या डोळ्यांवर होत असतो. अनेक लोकांना डोळे दुखणे, पुसट दिसणे, डोळे कोरडे पडणे, डोळ्यांत पाणी येणे अशा समस्या जाणवतात. योग्य वेळी काळजी घेतली तर डोळ्यांचे आरोग्य खूप चांगल्या पद्धतीने जपता येऊ शकते. खाली सांगितलेल्या काही गोष्टी आपल्या डोळ्यांना चांगले आरोग्य देऊ शकतो.
1. स्क्रीन टाईम साठी २०-२०-२० नियम चा वापर करा:
मोबाईल, कॉम्प्युटर किंवा टीव्ही वापरताना प्रत्येक 20 मिनिटांनी 20 सेकंदासाठी 20 फूट लांब एखाद्या वस्तूकडे पाहा. हा छोटासा नियम डोळ्यांचा ताण कमी करतो, डोळ्याला त्रास होण्याचे कमी होते, आणि डोळे रिलॅक्स होतात.
2. डोळे ओलसर ठेवणे महत्वाचे आहे:
डोळे कोरडे पडणे ही सर्वात कॉमन समस्या आहे. पाण्याचे सेवन कमी असल्यास त्यामुळे डोळे कोरडे पडू शकतात. दिवसभरात पुरेसे पाण्याचे सेवन करणे आवश्यक आहे. डोळ्यांसाठी आवश्यक असल्यास डॉक्टरांनी सांगितलेले ल्युब्रिकेटिंग आई-ड्रॉप्स वापरा.
3. योग्य प्रकाशात काम करा:
अंधारात मोबाईल वापराणे किंवा जास्त तेजस्वी प्रकाशात स्क्रीन पाहणे डोळ्यांसाठी हानिकारक असू शकते. वाचन किंवा स्क्रीन वापरताना पुरेसा प्रकाश असावा. स्क्रीन साठी Auto brightness मोड वापरणे फायदेशीर ठरू शकते. स्क्रीन मधून येणारी Blue Light हानिकारक असते आणि त्याचा झोपेवर ही परिणाम होतो.
4. योग्य आहार डोळ्यांसाठी महत्वाचा आहे:
डोळ्यांचे आरोग्य बाहेरूनच नाही तर आतूनही मजबूत असावे लागते. काही अन्नपदार्थ डोळ्यांसाठी फायदेशीर असतात जसे की गाजर, हिरव्या पालेभाज्या, मासे (ओमेगा-3), अंडी, लिंबूवर्गीय फळे हे पदार्थ डोळ्यांतील ‘रेटिना’ मजबूत करण्यास मदत करतात.
5. नियमित डोळ्यांची तपासणी करा:
डोळ्यात काही समस्या नसली तरी दरवर्षी एकदा डोळ्यांची तपासणी करून घेणे फायद्याचे आहे. लवकर निदान झाल्यास चष्म्याचा नंबर कमी वाढतो आणि आजार गंभीर होत नाही. लहान मुलांचे स्क्रीन टाईम वाढत असल्याने त्यांच्या डोळ्यांची तपासणी अधिक आवश्यक आहे.
डोळ्यांची समस्या वाढली तर काय करावे?
डोळे दुखणे, धूसर दिसणे, वारंवार डोळे लाल होणे, डोळ्यांत पाणी येणे, वाचन करताना त्रास जाणवणे अशी लक्षणं दिसली, तर नेत्रतज्ञांकडे (Ophthalmologist) त्वरीत तपासणी करणे आवश्यक आहे. घरगुती उपायांवर अवलंबून राहून उपचार उशिरा घेणे नुकसानकारक ठरू शकते.
Note: डोळ्यांची काळजी घेणे अवघड नाही. थोड्याशा सवयींमध्ये बदल केल्याने डोळे जास्त काळ निरोगी राहू शकतात. स्क्रीन वापर वाढलेला असला, तरी नियम पाळल्यास डोळ्याचा ताण आणि नुकसान टाळता येऊ शकते.
Also read, हार्ट अटॅकची सुरुवातीची लक्षणे कशी ओळखावी?