आजकाल हृदयविकाराचे प्रमाण वाढलेले दिसते. चुकीचा आहार, ताण-तणाव, व्यायामाचा अभाव आणि जीवनशैलीतील बदल यामुळे तरुणांमध्ये सुद्धा हार्ट अटॅकच्या केसेस वाढत आहेत. योग्य वेळी लक्षणं ओळखली, तर जीव वाचवता येऊ शकतो. चला तर सोप्या भाषेत जाणून घेऊ या, हार्ट अटॅक येण्यापूर्वी शरीर कोणती सूचना देतं?
हार्ट अटॅकची सुरुवातीची महत्वाची लक्षणे:
- छातीत अचानक दुखणे: छातीत जडपणा, चाकूने टोचल्यासारखं किंवा जळजळ होणारे दुखणं हे हार्ट अटॅकचे सामान्य लक्षण आहे. हे दुखणं हात, पाठीकडे, खांदा, जबडा किंवा मानेपर्यंत पसरू शकते.
- श्वास घेण्यास त्रास होणे: चालताना किंवा अगदी थोड्या कामातही श्वास अडखळणे, दम लागणे, हे संकेत हृदय रक्त पंप करण्यासाठी संघर्ष करत आहे, असे दर्शवते.
- अचानक घाम येणे: विशेषतः थंड घाम येणे, घाबरल्यासारखे वाटणे किंवा बेचैनी जाणवणे, ही हार्ट अटॅकची सुरुवातीची लक्षणं असू शकतात.
- मळमळणे किंवा उलटी होणे: हृदयविकाराच्या सुरूवातीला पोटात दुखणं, मळमळ, उलटी, ऍसिडिटीसारखी लक्षणं दिसू शकतात, विशेषत: महिलांमध्ये.
- अचानक कमजोरी किंवा चक्कर येणे: अचानक भारीपणा, गोंधळल्यासारखं वाटणे, अंगावर जडपणा येणे हे सुद्धा हृदयाशी संबंधित इशारे असू शकतात.
अशी लक्षणे दिसताच काय करावे?
जर एखाद्या व्यक्तीला हार्ट अटॅकची लक्षणं दिसू लागली, तर योग्य वेळी केलेल्या छोट्या कृतींमुळे रुग्णाचा जीव वाचू शकतो. घाबरू नका, पण वेळ अजिबात वाया घालवु नका.
- रुग्णाला शांत ठेवा: लक्षणं दिसल्यावर अनेकांना घाबरल्यासारखं वाटू शकतं. भीती वाढली, तर हृदयावर जास्त ताण येतो. रुग्णाला शांत बसवावे किंवा अर्धवट पाठ टेकून झोपवावे. बोलायला, चालायला किंवा हालचाल करायला बळजबरी करू नये.
- ताबडतोब 24×7 इमर्जन्सी हॉस्पिटलमध्ये संपर्क साधा: घरगुती उपाय करत बसू नका, ज्या ही हॉस्पिटल मध्ये रुग्णाला घेऊन जात असाल तेथे ECG व तातडीची उपचार सुविधा असणे गरजेचे आहे. रुग्णाला घेऊन जाताना पाठीवर झोपवून कार/ॲम्ब्युलन्सने हॉस्पिटलमध्ये घेऊन जा.
- स्वतःहून औषध देऊ नका: काही लोक Aspirin किंवा पेनकिलर देतात, पण ते चुकीचे ठरू शकते. डॉक्टरांनी सांगितल्या शिवाय कोणतेही औषधे घेणे हानिकारक ठरू शकते. Diabetes, BP किंवा रक्त पातळ करणाऱ्या औषधामुळे परिस्थिती आणखी बिघडू शकते.
- पाणी किंवा खाणं देऊ नका: छातीत दुखत असताना काहीजण रुग्णाला पाणी देतात, पण त्या वेळी इतर समस्या होऊ शकतात. खूप घाम येत असल्यास व डॉक्टर सांगितल्याशिवाय काहीही खायला देऊ नका. 👉 पाणी दिल्यास उलट्या किंवा श्वास घ्यायला अडथळा येऊ शकतो.
- बेशुद्ध पडल्यास CPR सुरू करा: जर रुग्ण बेशुद्ध पडला आणि श्वास चालू नसेल तर जवळ कोणी CPR (छातीवर दाब देण्याची पद्धत) जाणत असल्यास तात्काळ सुरू करावे.
हार्ट अटॅक टाळण्यासाठी जीवनशैली कोणते बदल करणे?
हृदयविकार अचानक होत नाही. आपली खाण्यापिण्याच्या सवयी, ताण-तणाव, झोप, वजन आणि व्यायाम यांचा त्यावर थेट परिणाम होतो. योग्य जीवनशैली स्वीकारल्यास हार्ट अटॅकचा धोका खूप कमी होऊ शकतो. खाली काही प्रभावी आणि सोपे उपाय दिले आहेत.
- आहारात बदल: हृदयाचे आरोग्य टिकवण्यासाठी काही सवयी भरपूर महत्वाच्या आहेत. जेवणामध्ये कमी मीठ व कमी तेल वापरणे. तळलेले, जंक फूड आणि बेकरी पदार्थ टाळणे. रोज फळे, भाज्या, सलाड, डाळी, सुका मेवा खाणे. रेड मीट चे सेवन कमी करणे (मटण, स्मोक्ड मीट). ओमेगा-3 असलेले पदार्थ खाणे (अंडी, मासे, बदाम, अक्रोड) चांगले ठरु शकते.
- नियमित व्यायाम अनिवार्य: हृदय मजबूत राहण्यासाठी रोज व्यायाम आवश्यक आहे. रोज किमान 30–45 मिनिटे चालणे. आठवड्यात किमान 3 वेळा हलका व्यायाम (योगा, प्राणायाम). जास्त वय असलेल्यांसाठी हळूहळू चालणे पुरेसे. वजन जास्त असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊन व्यायाम सुरू करणे.
- धूम्रपान आणि अल्कोहोलपासून दूर रहाणे: धूम्रपानामुळे रक्तवाहिन्या ब्लॉक होतात आणि हार्ट अटॅकची शक्यता दुपटीने वाढते. स्मोकिंग पूर्णपणे बंद करा. अल्कोहोल कमी करा किंवा पूर्ण टाळा. जे धूम्रपान करतात त्यांचा सहवास टाळा किव्हा त्या पासून अंतर ठेवा.
- पुरेशी झोप आणि ताण कमी करणे: ताण-तणाव हा हृदयविकाराचा मोठा शत्रू आहे. रोज किमान 7-8 तास झोप घेणे आवश्यक आहे. Meditation, प्राणायाम करून ताण कमी करू शकता. स्क्रीन टाइम कमी करणे फायदेशीर ठरू शकते. वाईट सवयींना “No” म्हणा (उशिरा झोपणे, अति काम).
- नियमित हृदय तपासणी करणे: विशेषतः जर कुटुंबात हृदयविकाराचा इतिहास असेल तर चेकअप करणे गरजेचे आहे. ECG, 2D Echo, TMT, Lipid Profile (कोलेस्टेरॉल चाचणी) हे चेकअप्स करणे चांगले ठरू शकते.
जर हृदयविकाराशी संबंधित लक्षणं दिसत असतील, तर त्वरित उपचार घेणे सर्वात महत्वाचे आहे. Ekvira Healthcare – Vinayak Hospital येथे अनुभवी डॉक्टर आणि 24×7 इमर्जन्सी सुविधा उपलब्ध आहेत.
Also read article related to High Blood Pressure..